सर्वसमावेशक उमेदवार असलेल्या खा. सुधाकर शृंगारेला प्रंचड मतानी विजयी करा – केंद्रे
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज : अहमदपूर प्रतिनिधी
सर्वसामान्यांना न्याय, मतदारसंघात शांततेचे वातावरण ठेवून सर्वागीण विकास करण्यासाठी खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना प्रंचड मताने विजयी करण्याचे अहवान भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभापती अशोक काका केंद्रे यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदर पांगरी ता. परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना अभिवादन करुन आशिर्वाद घेतले आहेत.सर्वधर्म समभाव व धार्मिक असलेल्या खा.सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे विकासाला मत
गेल्या दहा वर्षात देशाचा ज्या गतीने विकास झालेला आहे या विकासामुळे देशाची प्रतिमा व जगातील उंची वाढलेली आहे .गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून श्रृगांरे यांनी जातीय सलोखा राखत सर्वागीण विकास केला आहे.
देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच क्षेत्रात झालेला विकास होय . येत्या निवडणुकीतही आपल्याला देशाचा विकास हवा असेल तर माननीय मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात येणे गरजेचे आहे त्यासाठी लातूरचा खासदार सुधाकरराव शृंगारे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधाकर शृंगारे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे अहवान भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सभापती अशोक काका केंद्रे यांनी केले आहे .