नवदुर्गांच्या सत्कार प्रसंगी चाकूरात रंगली संगीत मैफिल
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

चाकूर महावार्ता न्यूज: विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. चाकूर च्या वतीने मंगळवारी सर्व सभासद व चाकूरकर जनतेसाठी दीपावलीनिमित्त आरोह प्रस्तुत नाते सुरांचे या संगीत मैफिलीचे आयोजन सायंकाळी ६ च्या दरम्यान सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते.
चेअरमन डॉ गोविंदराव माकणे यांच्या संकप्नेतून एक अनोखा रंजक कार्यक्रम प्रथमच चाकूरकर जनतेला अनुभवायला मिळाला. सुमधुर संगीताने अनेकांची मने प्रसंन्न झाली. यावेळी नवदुर्गा अर्थात संचालक मंडळातील महिला सभासद यांचा प्रसंगी रजनंदा शिवप्रसाद शेटे,अर्चना राजेश्वर इंद्राळे,सुलोचना बाबुराव माने, मंगलबाई दिलीप पांढरे, वनमाला परमेश्वर पाटील, सत्यशीला हणमंत वंगाले, रुक्मिनबाई संबा गंगापूरे, गवळनबाई बालाजी माने, सजुबाई रामराव राठोड यांचा नंदाबाई माकणे, वैष्णवी माकणे, सरोजा सगरे, अनिता शेटे यांच्या हस्ते साडी चोळी फेटा, शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यातून महीला सभासदांना प्रेरित करण्यात आले.
प्रसंगी महाराष्ट्रभर ज्या बाल गायकांनी आपल्या सुमधुर वाणीतून भक्तीगीत भावगीत नाट्यगीत आणि शेवटी चित्रपट गीताच्या मेजवानीचे चाकूरकर जनतेला मंत्रमुग्ध केले. तो नाते सुरांचे प्रस्तुत कार्यक्रमात गायिका डॉ वृषाली देशमुख, कु. शर्वरी डोंगरे, कु.सायली टाक, कु. उन्नती मुंढे,अपूर्वा पाटील, यांना हार्मोनियम वर साथ देणारे प्रा शशिकांत देशमुख, ईशान जोशी, संजय सुवर्णकार यांनी भक्तिमय वातावरण निर्माण करून श्रोत्यांना दीपावली च्या पूर्वीच रंजक करून आनंदित केले.
या कार्यक्रमाची संकल्पना चेअरमन डॉ गोविंदराव माकणे, यांची असून व्हॉईस चेअरमन जाकिर हुसेन कोतवाल, मॅनेजर कपिल अलमाजी , अजय नाकाडे,दिलीप गोलावार, नारायण बेजगमवार, दिगंबर मोरे, बालाजी तलवारे हणमंत उस्तूर्गे, राधाकिशन तेलंग,मन्मथ पाटील,शिरीष रेड्डी आदी उपस्थित होते..