
महावार्ता न्यूज लातूर, दि. 20 : जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदार जागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी या मोहिमेला प्रारंभ झाला.
‘मतदान माझा हक्क आहे आणि तो मी बजाविणारच’ असे नमूद केलेल्या फलकावर अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी स्वाक्षरी करून मतदान करण्याचा निर्धार करावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि प्रियांका आयरे, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे आणि नागेश मापारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही यावेळी फलकावर स्वाक्षरी करून मोहिमेत सहभाग नोंदविला.