देश सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान पदावर नरेंद्रजी मोदी राहणे गरजेचे -आमदार बाबासाहेब पाटील
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज अहमदपूर/प्रतिनीधी
देशाची सुरक्षा व देशाचा सर्वागीण विकासासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी नरेंद्रजी मोदी राहणे देश हिताचे असल्याचे प्रतिपादन अहमदपूर,चाकुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
निष्कलंक व निष्पाप असलेल्या खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे नरेंद्रजी मोदी यांना मत असल्याने महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी माझी व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद लावून खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचेही यावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने रेल्वे सेवा,विमान सेवा, राष्ट्रीय महामार्ग,वहातूकीसाठी रस्त्याचे जाळे उभे करून राज्याचा सर्वागीण विकास केला आसून देशाची मान जगात उंचावली आहे.
लोकप्रिय खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात हर घर नल योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभे करून जिल्ह्यात सर्वधर्म समभाव जोपासण्याचे मोलाचे काम केले असल्याने निस्वार्थ असलेल्या खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना दुसऱ्यांदा खासदार व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी येत्या 7 में रोजी होणाऱ्या निवडनुकीत महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.