तलाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गोविंद शिंगडे तर सरचिटणीसपदी अविनाश पवार यांची निवड
कर्तव्यदक्ष युवा तलाठी अविनाश पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

चाकूर महावार्ता न्यूज ; दि. 24 जून 24 रोजी महालक्ष्मी फंक्शन हॉल घरणी येथे लातूर जिल्हा तलाठी संघाच्या कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये सर्व जिल्हास्तरीय कार्यकारीणीच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे संघटक भिमाशंकर बुरूळे होते.यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष महेश हिप्परगे, मंडळ अधिकारी पंडीत जाधव, लातूर जिल्हा तलाठी संघाचे कार्याध्यक्ष
त्र्यंबक चव्हाण व प्रशांत तेरकर हे प्रमुख पाहुने म्हणून उपस्थीत होते.
नुकतेच काही दिवसापूर्वी लातूर जिल्हा तलाठी संघाचे राज्य प्रतिनीधी भिमाशंकर बेरूळे व जिल्हा अध्यक्ष महेश हिप्परगे यांनी राजीनामा दिल्यामुळे या बैठकीचे आयोजन सचिव गोविंद शिंगडे यांनी केले होते.यावेळी जिल्हातील सर्व 10 तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा प्रतीनिधी तसेच जिल्ह्यातील तलाठी – मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
यावेळी उपस्थीत
सर्वांनी गोविंद शिंगडे यांची नुतन जिल्हाअध्यक्ष म्हणुन तर अविनाश पवार यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच माजी जिल्हाअध्यक्ष महेश हिप्परगे यांची राज्य प्रतिनीधी म्हणुन निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष प्रशांत तेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी सुरज स्वामी यांनी केले.