महाविद्यालतीन विद्यार्थ्यांना पोलीस उप निरिक्षक राजेश घाडगे यांचे नवीन तीन कायदेविषयक मार्गदर्शन
काय झाला कायद्यात बदल? काय होऊ शकते शिक्षा?

महावार्ता न्यूज चाकूर – भाई किसनराव देशमुख महाविद्यालयात दिनांक 2 जुलै रोजी चाकूर पोलीस स्टेशनचे राजेश घाडगे पोलीस उप निरीक्षक चाकूर यांनी दिनांक 01 जुलैपासून देशात लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता, या तीन कायदे विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेश घाडगे (पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे.चाकूर )व श योगेश मरपल्ले पर्यवेक्षक प्रा.बाळासाहेब बचाटे, प्रा. सुमित देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते. देशात नवीन लागू झालेले कायदे जनतेच्या हिताचे असून ब्रिटिश काळातील दोष काढून ते सोपे व सुटसुटीत करून नवीन कायदे लागू केले आहेत. अशा या फौजदारी कायद्याची माहिती विद्यार्थी व जनतेला व्हावी म्हणून असे कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांनी केले यात त्यांनी कायदे कसे जनतेच्या हिताचे आहेत त्यांची योग्य अंमलबजावणी केली जावी त्याचा जनतेला लाभ व्हावा अशी अपेक्षा वेक्त केली.सूत्रसंचालन प्रा बी. एस.बचाटे यांनी केले. तर प्रा. रमेश शिंदे सरांनी सर्वांचे आभार मानले.