आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने तहसीलसमोर काळ्या फिती लावून आंदोलन, पहा काय आहेत मागण्या.

सुशिल वाघमारे संपादक महावार्ता न्यूज नेटवर्क

चाकूर (महावार्ता न्यूज) व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने विविध मागण्यांसाठी
चाकूर तहसीलसमोर काळ्या फिती लावून गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकारांचे दिनांक ४ जुलै २०२४ रोजी गुरुवारी महाराष्ट्रभर आंदोलन सुरु आहे.त्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार नरसिंह जाधव यांना निवेदन देण्यात आले.

काय आहेत मागण्या –
१) विधानसभा निवडणुकीत सणवार, उत्सव या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक, सर्व साप्ताहिक, लोकाभिमुख असलेल्या न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनलला पण जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करण्यात यावे.
२) शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात. वर्गवारीनुसार अन्याय करण्यात येऊ नये.
३) आर. एन. आय. कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी.
४) २५ वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे. तसेच २५ वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी.

५) टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्टींजर, पत्रकारांचा मानधना संदर्भातला ठोस निर्णय घ्यावा. एका बातमीसाठी चार वर्षापूर्वी एक हजार रुपये मिळायचे, आता दोनशे रुपये मिळतात.
६) टीव्हीच्या टीआरपी स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण आहे. याचे कारण टीआरपी आहे. टीआरपीची जीवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे.
७) वर्तमानपत्रांमध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही, त्यामुळे या मानधना संदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये कमिटी स्थापन करावी. त्या कमिटीच्या सूचनेप्रमाणे पत्रकारांचे मानधन ठरवण्यात यावे. सध्या असलेल्या आयोगाचे नियम कोणीही पाळत नाही.
८) पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासंदर्भामध्ये असणारी कमिटी, तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भामध्ये असणारा जुना जीआर रद्द करून नवीन जीआर तयार करावा. राज्यात चांगले काम करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनांना ‘त्या’ कमिटीवर काम करण्यासंदर्भामध्ये संधी द्यावी.
९) सर्वच वृत्तपत्रांचे २५ टक्के जाहिरात दर सरसकट वाढवून देण्यात यावेत. कलर जाहिरातींचा प्रीमियमही वाढून देण्यात यावा.
१०) सरकारी आणि खाजगी या दोन्ही रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या बाबतीमध्ये शासनाने नियमावली ठरवून द्यावी.
११) काळाप्रमाणे डिजिटल मीडियाने आपले पाऊल जोरदार टाकलेले आहे. जे न्यूज पोर्टल, न्यूज यूट्यूब चॅनल लोकाभिमुख, अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात.
१२) सेवानिवृत्ती योजनेची वाढवलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी. जे जे श्रमीक आहेत त्यांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा. या प्रमुख मागण्या आहेत.
हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे.
या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित नियमावली नाही केली तर येत्या १० जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने देण्यात आला.


प्रसंगी अध्यक्ष विनोद नीला,सरचिटणीस संग्राम वाघमारे,कोषाध्यक्ष दत्तात्रय बेंबडे,उपाध्यक्ष माधव तरगुडे, सहसरचिटणीस संजय पाटील,प्रसिद्धीप्रमुख दीपक पाटील,संगमेश्वर जनगावे, शिवशंकर टाक,विकास स्वामी, अ. ना शिंदे, माधव वाघ, सदाशीव मोरे,बापूराव माने,चेतन होळदांडगे आदिजण याप्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button