सी. एस.सी.कंपनी बोगस असून संगणक परिचालकांची लूट करतेय, सेवेत कायम करा यासाठी काम बंद आंदोलन चालू.
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे
चाकुर महावार्ता न्यूज संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन चालूच आहे. डिजीटल इंडिया द्वारे ग्रामपंचायत कार्यालयात डिजीटल सेवा पुरवण्यासाठी संगणक परिचालक नेमनुक करण्यात आली. मात्र ज्या कंपनीने केली त्यांनी माञ परीचालकाना तुटपुंजे मानधन दिले. मागिल अनेक वर्षापासून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे मानधन वाढ द्यावी यासाठी ते काम बंद आंदोलन करत आहेत.
2011 पासून डिजिटल इंडिया या नावाने पेत्येक ग्रामपंचायत मध्ये एक संगणक परिचालकाची नेमणूक केली आहे व ते मनुष्यबळ पुरवण्याची जेम्मेदारी हि राज्य शासनाने केंद्रातील एक csc कंपनी कडे टेंडर दिले होते. मुळातच भ्रस्ट कंपनी असल्याने ती ग्रामपंचायत कडून 12200 रु हे ग्रामपंचायत कडून घेऊन ती ग्रामपंचायत संगणक परिचलकाला 6930/-इतके तुटपुंजे मानधन हि कंपनी 4 – 4 महिने देत नही, वरून कामाचे टार्गेट देत आहे, फ्रॉड डेटा इंट्री करण्यास भाग पाडत आहे. या सर्व त्रासाना कंटाळून ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी 17/11/2023 पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन चालू केले आहे. संगणक परिचालकांची मागणी एकच आहे ती म्हणजे ग्रामपंचायत ला आकृती बंद स्थापन करून त्यात संगणक परिचल यांना नियुकी देणे व किमान वेतन देणे या या मागणी साठी राज्याचे ग्रह मंत्री यांच्या समोर गेली दोन वर्षा पासून मांडण्यात येत आहे व तसे त्यांनी आश्वासन हि दिले आहे. पण अद्याप पदानिर्मितीचे आदेश निघालेले नाही. त्याच बरोबर राज्याचे उप मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण तसे पत्र देऊन आश्वासित केले होते. याला दोन वर्ष होऊनही तसे आदेश निघत नही. संगणक परिचालक यांचे असे म्हणणे आहे की शासन यावलकर समितीने दिलेल्या रिपोर्ट नुसार पद निर्मिती करून त्यातून नियुकी जोपर्यंत देत नाहित तो पर्यंत काम चालू करणार नही.
या झोपेचे सोंग घेतलेल्या शासनास जोपर्यंत जाग येत नाही व आकृती बंदातुन नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत काम बंद अंदोलन चालूच राहणार अशी बातमी घरणी ग्रामपंचायत चे संगणक परिचालक सूर्यकांत कांबळे यांनी दिले आहॆ.