सामाजिक

भाऊसाहेबांनी शोषितांच्या अन्यायाविरोधात बहुजनासाठी लढा दिला-आ.बाबासाहेब पाटील

अहमदपूर: (महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे)

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ ,अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित छत्रपती शाहू महाराज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार आणि “आठवणीतले भाऊसाहेब ” हा संयुक्त जयंती कार्यक्रमा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संयुक्त जयंती निमित्त “आठवणीतले भाऊसाहेब ” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी पंचशील ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
मंचकरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे उद्घघाटक अहमदपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांनी दीप प्रजलवीत करून उद्घघाटन केले त्यानंतर ते पुतळ्यासमोर अभिवादन सभेत आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,तथागत गौतम बुद्धाच्या नंतर या पृथ्वीतलावरी तेजस्वी सुर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जाते त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी खूप काही केले त्यांच्यासाठी वस्तीग्रह काढून त्यांना मोफत राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाची शाळा शिकून आपल्या शाहिरीतून समाजाला जागृत करण्याचे काम केले आणि रशियात जाऊन त्यांनी भाषण केले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे. असे ते म्हणत असत.

कार्यक्रमास उपस्थित जनसमुदाय

भाऊसाहेब वाघंबर यांनी आपल्या समाजासाठी आणि दलित चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने करून मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे अशा कर्मवीर भाऊसाहेबांमुळे आज प्रत्येक जिल्ह्यात दलित समाज गुन्हा गोविंदाने नांदत आहे आणि भाऊसाहेबांनी त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे शिकवले आणि आंदोलने करून त्यांना गायराने मिळवून देण्याचे काम केले. म्हणूनच सांगतो की भाऊसाहेबांनी शोषितांच्या अन्यायाविरोधात बहुजनासाठी लढा देऊन समाजाला जागृत करण्याचे काम केले अशा महान समाज सुधारकांना मी अभिवादन करतो. असे छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ठेवण्यात आलेल्या “आठवणीतले भाऊसाहेब ” या कार्यक्रमाच्या अभिवादनसभेत आमदार बाबासाहेब पाटील उद्घघाटनपर भाषणात सोमवारी दि १४ ऑगस्ट 2023 रोजी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते यावेळी त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन सभेला सुरुवात झाली. पंचशील ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकरावजी पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी व बाहेर विदेशात जाण्यासाठी त्याना खूप मदत केली व आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी समाज जागृतीची काम केले. आणि आपल्या अहमदपूर तालुक्यात खंडाळी येथे अण्णाभाऊंचे वास्तव्य होते ते आपल्या अहमदपूर तालुक्यात सुद्धा आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे कामे करीत फिरले आहेत अशा महान विभूतीचे विचार आपण सर्वांनी अंगीकृत केले पाहिजे आणि आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी तर गोरगरिबांसाठी खूप काम केले, कष्ट केले, त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काम केले त्यांच्या या कष्टामुळे व लढवय्या वृत्तीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक मागासवर्गीय बहुजन समाजातील व्यक्तीला याचा लाभ मिळाला. त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार दूर झाला अशा दूरदृष्टी असणाऱ्या भाऊसाहेब वाघंबर यांना आम्ही जाधव परिवाराच्या वतीने अभिवादन करतो त्यांचे कार्य खूप महान आहे यावेळी त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव अरुण वाघंबर हे चांगल्या पद्धतीने चालवत असून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत करा ते सुद्धा तुमच्या कोणत्याही अडीअडचणीला मदत करण्यास तयार होतील आणि करतील सुद्धा अशा नव नेतृत्वास आपण तयार केले पाहिजे हिच
भाऊसाहेब वाघंबर यांना आदरांजली ठरेल त्यांच्यावर त्यांच्या कार्यावर बोलायला आपणाला दिवस पुरणार नाही पण मी काही जास्त बोलणार नाही. असे मंचकराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले तर प्रमुख पाहुणे रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे , भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील. एडवोकेट भारत चामे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माझी जि प सदस्य माधव जाधव, धनंजय जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, पोलीस उपाधीक्षक मनीष कल्याणकर,तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंदेलवाड साहेब,न.प. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे,
स.पो.नि प्रभाकर आंधोरीकर, स.पो.नि. पठाण साहेब, प्राचार्य सुनीता शिंदे मॅडम, तानाजी साने, ज्ञानोबा बडगिरे, श्रीकांत बनसोडे, सरस्वतीबाई कांबळे, अंजलीताई वाघंबर,
डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,अनिता कांबळे,विद्रोही कवी राजेंद्र कांबळे,बाबासाहेब वाघमारे,सिनेट सदस्य निखिल कासनाळे, माजी नगरसेवक राहुल शिवपुजे,अभय मिरकले,दयानंद वाघमारे, प्रशांत जाभाडे,गोविंद गिरी,शाहीर परतवाघ,शाहीर साबळे, शेषराव ससाणे,डॉ.संजय वाघम्बर,वसंत परतवाघ, जयंती समितीचे स्वागताध्यक्ष प्रकाश फुलारी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांनी केले.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना बाबासाहेब वाघमारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य ,बंधुता आणि न्याय , हक्क दिले दिन दलितांचा उद्घार केला म्हणून जगात एकच साहेब आहेत असा बुलंद आवाज निनादतोय एक साहेब बाबासाहेब.संपूर्ण जगात आपल्याला बाबासाहेबांचे वारसदार म्हणून ओळख दिली हिच ओळख आपल्याला जबाबदारी जाणीव करून देते. त्यामुळेच भाऊसाहेब वाघंबर यांनी डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन लातूर जिल्ह्यात अख्या मराठवाड्यामध्ये दलित चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केले. मी त्यांना लहानपणापासून पाहतो अहमदपूर तहसील कार्यालयावर आंदोलने करणे, मोर्चे काढणे, दिन दलित गोरगरीब माणसांना बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी केले आहे. त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून बहुजन समाजासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले. आज अहमदपूर शहरात या मोक्याच्या ठिकाणी भाऊसाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मोफत जागा दिली म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. म्हणूनच नगरपरिषद कार्यालय अहमदपूर यांनी याची दखल घेऊन या चौकाला ” कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर ” यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला. असे ते आंबेडकरी चळवळीतील डॅशिंग आणि लढाऊ असे नेतृत्व होते आज त्यांच्यासारखा लातूर जिल्ह्यात कोणताही डॅशिंग आणि लढवय्या कार्यकर्ता नेता नाही त्यांच्यात बोलण्याची एवढी ताकद होती की अधिकारी सुद्धा घाबरून जायचे त्यांनी एखाद्या बहुजन समाजातील किंवा मागासवर्गीय समाजातील लोकांची कामे घेऊन गेली तर ती कामे ताबडतोब व्हायची मार्गी लागायची पण आजची दलित चळवळ अवस्था अत्यंत वाईट अवस्था झाली असून त्याला कोणीही वाली राहिलेला नाही म्हणून आपण सर्वांनी भाऊसाहेब वाघंबर यांचे विचार, कार्य आत्मसात करून त्यांच्या कार्यावर, पावलावर पाऊल टाकून जर कार्य केले तर समाजात कुठेही अन्याय अत्याचार होणार नाहीत असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात बाबासाहेब वाघमारे हे म्हणाले.तत्पूर्वी पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे, स.पो.नी. पठाण साहेब, स.पो.नी. प्रभाकर आंदोरीकर, सौ अंजली वाघंबर, सरस्वतीबाई कांबळे, श्रीकांत बनसोडे, आदिनी मनोगत व्यक्त केले तर गोपीनाथराव जोंधळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मान्यवरांचा सत्कार व
” आठवणीतले भाऊसाहेब ” हा कार्यक्रम व जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक / संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, कलीम अहमद , शुभम वाघबर , आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड,आकाश व्यवहारे ,बाबु भाई शेख, श्रीरंग गायकवाड आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन शाहीर सुभाष साबळे यांनी केले तर आभार अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी सर्वांचे मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.दिवसभर शाहीर सौ. लोखंडे व विष्णू पोतवळे यांचा भीम बुद्ध गीतांचा दणदणीत असा कार्यक्रम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button