मुंबई पोलीसाने चाकूरच्या रोहिण्यात सुरू केला ड्रग्ज कारखाना ?
17 कोटींचे मेफीड्रोन ड्रग्ज जप्त. लातूरच्या ग्रामीण भागातून कारवाई.
चाकूर: तालुक्यातील रोहिणा हे गाव अंबिका तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात वर्ग १ पासुन चतुर्थ श्रेणी अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 84 पोलीस कर्मचारी याच गावाने पोलीस खात्याला दिले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथक मंगळवारी दुपारी रोहिना गावातील एका शेतात दाखल झाले आणि रोहिण्याचे ड्रग्स कनेक्शन उघडकिस आले.
मुंबईहून महसूल गुप्तचर संचालनालयाचे पथक आले त्यांनी रोहिण्याच्या गाढव माळातील त्या शेडचा तपासही लावला. शेडमध्ये मुंबईहून कच्चामाल आणून ड्रग्ज र्मिती केली जात होती. ईरटीगा कंपनीच्या एम एच १४ एल बी १८९२ गाडीतून कर्मचारी आरोपीस जात होते. गाडी लातूर रोड नजिक महामार्गावर ३६१ वर आली असता आरोपी आहाद मेमनने अधिकाऱ्यांना व ड्रायव्हरला धक्का बुकी करत स्टेअरींग फिरवली आणि गाडी हॉटेल चे फलक तोडून हॉटेल बाहेरील दुचाकीस धडक देत गिट्टीच्या ढिगाऱ्याला अडली अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कर्मचाऱ्यांना व आरोपीला किरकोळ मार लागला. वृंदा सिन्हा यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलीस ठाण्यात कमल 353 नुसार आरोपी आहाद शफिक मेमन याच्या विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात घडला आणि मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या शोधात आलेल्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाच्या कारवाईची माहिती मिळाली.
मुंबई ते चाकूर ड्रग्ज कनेक्शन?
अंबिका देवीच्या तीर्थक्षेत्रांना प्रसिद्ध असणाऱ्या रोहिना गावाला एक सांस्कृतिक वारसा आहे. याचबरोबर या गावातून जवळपास 84 पोलीस जवान पोलीस खात्यात नोकरी करता. मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला वाम मार्गाने पैसा कमावण्याची लालसा लागली. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सहवासातील इतर आरोपींच्या शोधात पथक चाकूर तालुक्यात आले. गाढव माळावरील त्या उजाड रानात पोलिसांनी एका शेड वर छापा मारला आणि आरोपीसह १७ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज निर्मितीचा कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने शोधून काढून उद्ध्वस्त केला.
याप्रकरणी ज्या शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात होती त्या शेतमालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मराठवाड्यातील तुळजापूर मंदिरातील काही पुजारी अशाच एका ड्रग्ज प्रकरणात आरोपी सिद्ध झाल्यानंतर आता मीरा-भाईंदर येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्याच्याच गावात ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उभा केल्याचे झाले चर्चिले जात आहे.
याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांच्याशी संवाद साधला असता अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.तीर्थक्षेत्र आणि पोलिसांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील एका पोलिसानेच मुंबई पोलिसांची अब्रू तर चव्हाट्यावर आणलीच पण गावाची ही अब्रू घालवली असं गावकऱ्यातून बोलले जात आहे.
या ठिकाणी किती दिवसापासून हा ड्रग्ज निर्मितीचा गोरख धंदा चालू होता. कोठे कोठे सप्लाय केला जात होता. याबाबत गावकऱ्यांना मात्र कसलीही कुणकुण नव्हती. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने मात्र कारवाई करून सगळ्यांचीच डोळे उघडले आहेत. चाकूर तालुक्यातील रोहिण्याचे कनेक्शन आता थेट मुंबईतील ड्रग्ज माफीयासी जोडले गेले आहे. चांगल्या पगाराची नोकरी असतानाही अधिकच्या पैशाचा हव्यास झाला. रोहिण्याच्या मुंबई पोलीसाने ड्रग्ज कारखानाचा उघडला.
या प्रकरणात स्थानिकचे कोण कोण सहभागी आहेत याची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.