चाकूरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी भव्य शोभा यात्रेने वेधले चाकूरकरांचे लक्ष

चाकुर (महावार्ता न्यूज)
येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समीतीच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेने चाकूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समीतीच्या वतीने सकाळी येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, नरेंद्र शेटे,अॅड.संतोष माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विश्वशांतीधाम मंदिर येथे उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,नवीन महात्मा बसवेश्वर चौक येथे संजय विनायकराव पाटील व राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,येथील सोसायटी चौक येथे जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गजानन ईश्वर पाटील,सचिव ओम नागनाथ हामणे, उपाध्यक्ष सचिन शेटे, निलेश डूमने,शिवकुमार गादगे,राम पाटील,मिरवणुक प्रमुख रविकिरण स्वामी, संतोष पाटील यांच्यासह जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
भव्य शोभा यात्रेने वेधले चाकूरकरांचे लक्ष
सायंकाळी विश्वशांती धाम मंदिर येथून परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या हस्ते जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन करुन भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली.या शोभा यात्रेमध्ये फटाक्याची आतिषबाजी, संबळ पथक,सनई पथक हलगी पथक तसेच विविध पथकांनी सादर केलेल्या कला व आकर्षक विद्युत रोषणाईने चाकूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. या शोभायात्रेत आ.बाबासाहेब पाटील,माजी मंत्री विनायकराव पाटील,नगराध्यक्ष कपिल माकणे,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे,गटनेते करीमसाब गुळवे,सोसायटीचे चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील,भाजयुमो प्रदेश सचिव अॅड.युवराज पाटील,माजी उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,सागर होळदांडगे,मोहनराव पाटील, युवक नेते अमरेश्वर पाटील,संजय स्वामी महाराज यांच्यासह राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले होते.