मराठा आक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक दिवशीय लक्षनिक उपोषण.
महावार्ता न्यूज नेटवर्क

चाकूर (महावार्ता न्यूज) दिं 3 चापोली येथे मराठा आरक्षणाला विविध समाजाचा पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार चापोली येथील सकल मराठा समाजातर्फे आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून किंवा स्वतंत्र गट करून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी चाकूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली . तसेच कोपर्डी येथील बलात्कार करणाऱ्या नराधामांना तत्काळ फाशी देण्यात यावी.मराठा समाज बांधवांवर आरक्षण आंदोलनामध्ये जी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत ती तत्काळ मागे घ्यावीत व सारथी संस्थेमार्फत सर्व मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी अशा मागण्या सकल मराठा समाज चापोली सर्कल यांच्यावतीने करण्यात आल्या.चापोली येथील लिंगायत महासंघ, सकल मुस्लिम समाज बांधव चापोली तसेच धनगर समाज बांधव चापोली यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला.दहा उपोषणकर्ते पाणी न पिता दिवसभर ग्रामपंचायत कार्यालय चापोली समोर उपोषण केले व लवकरात लवकर गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याची मागणी केली .
यावेळी चापोली चे सरपंच डॉ.भालचंद्र चाटे, धनगर समाजाचे नेते सुरेश शेवाळे व मुस्लिम समाजाचे नेते मुसद्दीक देशमुख यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शक केले.आरक्षण मागणीसाठी वैष्णव शिंदे,व्यंकटेश शिंदे, किशोर कदम,तुळसीदास माने,मनोज शिंदे, नामदेव डोकळे यांनी मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी प्रभाकर होनराव, बाबुराव शिंदे,सुभाष शंकरे, सिराज भाई देशमुख, फारूक मियां देशमुख ,मेहताबसाब मोमीन, उपसरपंच निसार देशमुख,विश्वनाथ पाटील, सुरेश शेवाळे ,नारायण काचे,मुसद्दीक देशमुख,शेख जिलानी, सय्यद शादूल, गजानन होनराव, सिध्देश्वर गुळवे, लक्ष्मण आवळे, माऊली शेवाळे यांच्यासह चापोली येथील सर्व सकल मराठा समाज व इतर समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.लाक्षणिक उपोषण यशस्वी करण्यासाठी मंगेश शिंदे, देवानंद जगदाळे, रमाकांत जगदाळे,संतोष जगदाळे, भैय्या आबंदे, गिरीधर शिंदे,विढ्ढल पवार, महेश जगदाळे यांच्या सह सर्व मराठा बांधवांनी परिश्रम घेतले.