विभागीय क्रीडा संकुल,आकाशवाणी,FM radio केंद्र उभारणीची मागणी.
महावार्ता न्यूज लातूर : (संपादक सुशिल रंगनाथ वाघमारे)

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री ना अनुराग ठाकूर यांची आज संसद भवन, नवी दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना गेल्या अनेक वर्षापासून लातूरमध्ये FM रेडिओ चॅनेल्स आणि आकाशवाणी केंद्र सुरू करण्याबाबतची अतिशय महत्त्वाची मागणी प्रलंबित असल्याचे लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.
लातूर हे शहर शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या राज्यांमध्ये अतिशय नावाजलेले आणि पुढारलेले असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून लातूर येथील आकाशवाणी केंद्राच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने केंद्रीय माहिती प्रसारण
मंत्री ना. अनुरागजी ठाकूर यांना लातूर येथे आकाशवाणी केंद्र सुरू करण्याबाबत पत्राद्वारे खासदार सुधाकर शृंगारे यांनी विनंती केली.
लातूरसाठी नवनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात खा सुधाकर शृंगारे”
तसेच लातूर जिल्ह्यात अद्याप विभागीय क्रीडा संकुल नसल्याने लातूरमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्याच्या अनुषंगाने पाऊल उचलण्याबाबत देखील मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.