जवानाकडून जिल्हा परिषद शाळेत अनोखी भेट

जळकोट: (महावार्ता न्यूज) जवानाकडून जिल्हा परिषद शाळेत अनोखी भेट
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याच्या चेरा येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांसह आजी जवान राजगिरवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेला स्वतःचे साऊंड सिस्टम नसल्याचे धनराज बाबुराव राजगीरवाड यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळावी म्हणून स्वखर्चातून शाळेसाठी साऊंड सिस्टीम साठी येणारा सर्व खर्च देण्याचे बक्षिस स्वरूपात जाहीर केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेरा तालुका जळकोट जिल्हा लातूर या शाळेची स्थापना दिनांक 3/9/1933 म्हणजेच स्वातंत्र्य पूर्वीची आहे. याच शाळेतून अनेक अधिकारी कर्मचारी घडून गेल्या आहेत.
जळकोट तालुक्यामध्ये विविध उपक्रमात सतत अग्रेसर असणारी चेरा येथील जिल्हा परिषद शाळा आहे. म्हणून भारतीय सैन्य दलातील कार्यरत जवान धनराज बाबुराव राजगिरवार यांनी आपण या शाळेचे काही देणे लागतो म्हणून ही भेट दिली आहे. यावेळी जवान अर्पण मोरे, विठ्ठल मोरे, यांच्यासह सरपंच प्रकाश माने उपसरपंच भागवत माळी राजू मुळे पोलीस पाटील कृष्णा घुमटवाड शाळा व्यवस्थापन समितीचे सदाशिव बेडदे , शाळेचे मुख्याध्यापक बालाजी काटे उपस्थित होते.