क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महावार्ता न्यूज / सुशिल वाघमारे

तळेगांव ता.अहमदपूर – येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी सी. आय. एस. ग्रूप ऑफ स्कूलच्या सी.ई.ओ रितू मद्देवाड, प्राचार्य जेबाबेरला नादर, उपप्राचार्य अनिल कुमार शर्मा, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, अकॅडमीक कोऑर्डिनेटर अनामिका शाह, सर्व शिक्षक वृंद, शाळेचे विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
मुख्य अतिथी सी आय एस ग्रूप ऑफ स्कूलच्या सी.ई.ओ. रितू मद्देवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समूह राष्ट्रगान तसेच राज्यगीत गायन करण्यात आले. यानंतर विद्यार्थी बँड ग्रुपच्या मदतीने ( सफायर हाऊस, रुबी हाऊस, पर्ल हाऊस व यमरल्ड हाउस) विद्यार्थ्यांनीजबरदस्त परेड सादर केले. प्राचार्य जेबा नादर यांनी आलेल्या पाहुण्यांचे तसेच पालक विद्यार्थ्यांचे स्वागतपर भाषण केले. शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या वीर महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपली म्हणजेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजाची भूमिका काय आहे यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे देशभक्ती जागृत केली. त्यामध्ये प्रभावी भाषणे, सामूहिक नृत्य, माइम ॲक्ट, रोल प्लेॲक्ट, कराटे, पिरॅमिड इ. सादर केले.
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक मिळवला त्यांना प्रमाणपत्र, मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य अतिथी रितू मद्देवाड यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या पुढील काळामध्ये जर टिकायचं असेल तर दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं काळाची गरज आहे. आजची ही लहान पिढी उद्याचे देशाचे भवितव्य आहे यांना घडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना यादव व शेली नाथ यांनी केले. तर आभार प्रदर्शन मंगेश कडपूरकर यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. मोठ्या आनंदात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.