
चाकूर ,दि.२४(महावार्ता न्यूज) जगातून संपूर्ण पोलिओ निर्मूलन करण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून जागतिक पोलियो दिनानिमित्त शहरातून रँली काढण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.पोलिओ दिनानिमित्त मंगळवारी रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने जनजागृती पर उपक्रम घेण्यात आला. तसेच शहरातून रॅली काढण्यात आली. शासकीय ग्रामीण रुग्णालयातून रँलीस प्रारंभ करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम नरवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आले. तसेच शाळांमध्ये पोलिओ लसीकरण , व्हिडिओ क्लिप मराठी व इंग्रजी भाषा मध्ये दाखवण्यात येणार असून वर्तमानपत्रे ,फेसबुक ,व्हाट्सअप, सोशल मीडिया वरती जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी दिली.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी महाराष्ट्रातील ११ प्रशासकीय जिल्ह्यामध्ये हे उपक्रम एकाच वेळी राबविण्यात यावे असे आवाहन केले आहे .
रोटरीने १९८५ मध्ये जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी पुढाकार घेऊन पोलिओ प्लस कार्यक्रम सुरू केला. रोटरीने १.६ अब्ज डॉलर्स खर्च करून अगणित रोटरी सदस्यामार्फत १२२ देशामधील २.५ अब्जाहुन अधिक मुलांचे लसीकरण केले आहे. या रॅलीसाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सतीश कदम ,क्लब सचिव विश्वनाथ एडके, क्लब ट्रेनर डॉ.संजय स्वामी, क्लब ट्रेझरर डॉ.चंद्रप्रकाश नागिमे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर शिवदर्शन स्वामी, डॉ.अमोल शिवनगे, डॉ. नसीरबेग मिर्झा, संजय कस्तुरे, सागर रेचवाडे, शैलेश पाटील, संजय पाटील ,सुधाकर हेमनर अ.ना.शिंदे, अमोल येरवे, उद्धव सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.