मराठवाड्यात चाकूर तालुका अव्वल, तालुकाध्यक्ष विनोद नीलांचा होणार गौरव
व्हाईस ऑफ मीडिया उत्कृष्ट पत्रकार संघाचा उत्कृष्ट तालुकाध्यक्ष अवार्ड चाकूर तालुक्याला जाहीर.

लातूर:महावार्ता न्यूज : व्हॉईस ऑफ मीडिया राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष अवॉर्ड मराठवाड्यातुन चाकूर तालुकाध्यक्ष अॅड.विनोद गणपतराव निला यांना जाहीर करण्यात आला आहे.
सदरील पुरस्काराचे मुंबई येथे वाय.बी चव्हाण सेंटर मुंबई येथे २६ फेब्रुवारी२०२४ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे सन २०२३चे राज्य उत्कृष्ट पदाधिकारी अवॉर्ड,पॉझिटिव्ह जनालिझम अवॉर्ड,महाराष्ट्र भूषण अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत.राज्य उत्कृष्ट पदाधिकारी अवॉर्ड मराठवाड्यातुन लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुकाध्यक्ष अॅड.विनोद गणपतराव निला यांना जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी प्रत्येक विभागातून दोन सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना व्हॉईस ऑफ मीडिया सर्वोत्कृष्ट तालुका 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातून एका विभागाला, एका जिल्ह्याला. आणि एका शहरालाही, व्हॉईस ऑफ मीडिया सर्वोत्कृष्ट 2023 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.सदरील पुरस्काराचे वितरण मुंबई येथे वाय.बी चव्हाण सेंटर येथे २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.०० विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल एडवोकेट विनोद नीला यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.