माजी जिल्हा परिषद सदस्यावर युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवाची जबाबदारी
चाकूर: (सुशिल वाघमारे/ महावार्ता न्यूज)

विद्यमान सिनेट सदस्य अॅड. युवराज पाटील चाकूरकर यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आल्याचे पत्र प्रदेश प्रभारी आणि भाजप प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत अॅड. युवराज पाटील यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी घोषीत केले यानंतर प्रदेश प्रभारी आणि भाजप प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. युवराज पाटील यांनी यापुर्वी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले असून सध्या ते स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात दुसऱ्यादा सिनेट सदस्य झाले आहेत. युवराज पाटील हे सामजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात. चाकुर तालुक्यांतील युवक नेत्रुत्व म्हणुन प्रसिद्ध आहेत. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबददल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.