मनोरंजन
प्रा शिवाजी खिराडे शिक्षणशास्त्र विषयात नेट परिक्षा उत्तीर्ण,

चाकूर ,दि.२९(महावार्ता न्यूज.) येथील भाई किशनराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.शिवाजी सुभाष खिराडे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत यश संपादन केले आहे . खिराडे हे मराठी विषयात उत्तीर्ण झाले असून यापूर्वी इतिहास या विषयात २०१९ या वर्षी नेट तर २०२१ या वर्षी शिक्षणशास्ञ या विषयात सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबदल संस्थेच्या अध्यक्षा सिमाताई देशमुख ,सचिव अँड.पी.डी.कदम,उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख ,सह सचिव बाबासाहेब देशमुख ,प्राचार्य डाँ.सर्जेराव शिंदे ,पर्यवेक्षक प्रा.बाळासाहेब बचाटे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.