व्हॉईस ऑफ मीडियाच्या अध्यक्षाच्यां वाढदिवसानिमित्त पंचायत समीती परीसरात वृक्षारोपण संपन्न
महावार्ता न्यूज - सुशिल वाघमारे गट विकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांचा स्त्युत्य उपक्रम

चाकूर : व्हॉइस ऑफ मीडिया चे तालुकाध्यक्ष विनोद निला यांचा वाढदिवस पंचायत समीतीत गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सत्कार करून व केक कापून साजरा केला.
वाढदिवसानिमित्त पंचायत समीती परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत वृक्षारोपण चळवळ गतिमान करण्याचा यामाध्यमातून संदेश देण्यात आला आहे.
पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे सततच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. चाकूर व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद गणपतराव निला यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती परीसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी पत्रकार विनोद निला यांचा सत्कार करून व केक कापून अभिष्टचिंतन केले. पंचायत समिती परीसरात विनोद निला, पत्रकार संघाचे जिल्हा सह सरचिटणीस संगमेश्वर जनगावे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अंगद पवार, पत्रकार संगमेश्वर जनगावे, अशोक चिंते, सह.प्रशासन अधिकारी व्यंकट घोडके, क.प्र.अधिकारी माधव वागलगावे, विस्तार अधिकारी अनंत पुट्टेवाड, कृषी अधिकारी प्रदीप हालकंचे, लेखा अधिकारी संजय भाले, कनिष्ठ लेखा अधिकारी मुक्तदीर मणियार, विस्तार अधिकारी महेश माने, संग्राम भुरे, उध्दव राठोड, संतोष मुदमे, माधव शेळके, भागवत गुडदे, परवेज शेख यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.