समाजातील प्रत्येक घटकांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे – प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

चाकूर ( महावार्ता न्यूज )
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने ” शेअर मार्केट मधील गुंतवणूक जागृती” या विषयावर प्राचाय डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली , प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्रदीप गुडसूरकर, विभाग प्रमुख डॉ. संभाजी जाधव, प्रा. मल्हारी जक्कलवाड, प्रा. सारिका जगताप यांचा उपस्थितीत विद्यार्थांसाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अॅड. गुडसूरकर म्हणाले सध्या वाढणारी महागाई वर मात करावयाची असेल तर काळानुरूप गुतंवणूक करणे गरजेचे आहे. सट्टा बाजारामुळे शेअर मार्केट मध्ये अनेक गैरसमज झालेले पाहायला मिळतात, गुंतवणूकदारांनी कपंनॅचे बॅलन्स सिट चा अभ्यास केला पाहिजे, गुतंवणूकीच्या अनेक संधी शेअर मार्केट मध्ये आहेत याचे विद्यार्थ्यांनी आकलन केले पाहिजे असे सुचित केले.
अध्यक्षीय समारोप प्रसुंगी प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले आज जन सामान्याना सुध्या वित्तिय साक्षरतेची गरज आहे, जीवन मूल्य मानवी जीवनाला सुंदर बनवतात अर्थार्जन जीवनाला सुखी समृद्ध बनवतो, अर्था शिवाय जीवन निरर्थक आहे, वर्तमान -भविष्यातील सुखी समाधानी जीवनासाठी कष्टकरी असो की नौकरदार प्रत्येकांनी छोटी का असेना गुतंवणूक करणे आवश्यक आहे, माणसाला ऑक्सिजन प्रमाणे पैशाची ही तेवढीच गरज आहे असे संबोधित केले.
प्रास्ताविक व सुतसंचलन डॉ. संभाजी जाधव यांनी केले तर आभार प्रा. राजेश विभुते यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.