शिरूरच्या पहिलवानापुढे चाकूर चा वाघ नरमला – सोमवारपासून चाकुरात चर्चेला उधाण
चाकूर/लातूर (महावार्ता live/सुशिल वाघमारे)

राजकारणात नवखे मात्र मोठ्या उमेदीने आ.बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्यांनी राजकीय पर्वाला सुरुवात केली.दोन तीन वर्ष राष्ट्रवादी पक्षात राहून पक्ष बांधणी केली. महाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र पक्षाची एन्ट्री झाली मग मात्र ज्यांना आमदारच होण्याची इच्छा जागृत झाली. आणि उत्तमराव वाघ यांनी राष्ट्रवादी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदाला लाथाडून थेट भारत राष्ट्र समितीत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या सवंगड्यासह पक्ष प्रवेश केला.
आणि BRS पक्षाचा विधानसभेचा उमेदवार असल्याचे जाहीर केले. पाहता पाहता चाकूर तालुक्यात गाव खेड्यात गुलाबी झेंडे फेटे रुमाल अनेकांच्या खांद्या डोक्यावर दिसू लागले. दिवस रात्र एक करत उत्तमराव वाघ व त्यांचे सहकारी BRS पक्ष संघटन सदस्य नोंदणी,पक्ष बांधणी करू लागले. गावोगावी शेतकरी कामगार,युवक, त्याच त्या पक्षात बोर झालेले, कोणी तेलंगणा च्या स्कीम पाहून पक्षाला सपोर्ट करण्यासाठी उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वखाली पक्षात प्रवेश करु लागले…
दिवसेंदिवस उत्साह वाढत गेला. शिरूर चे पहिलवान, खेळाडू आ बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात राजकिय वाटचाल सुरू झाली त्याच्याच विरोधात विधानसभा निवडणुकीत चाकुर च्या उत्तमराव वाघांचा सामना रंगणार हे चित्र निर्माण झाले.भारत राष्ट्र पक्षाची चाकूर अहमदपूर ची उमेदवारी मिळणार ही इच्छा मनात कायम होती. नवखा तगड्या भक्कम उमेदवार मिळाला म्हणून जनतेने डोक्यावर घेऊन बळ ही दिले. गावोगावी सत्कार होऊ लागले. अहमदपूर च्या शिरूर गावचे दोन वेळा आमदार राहिलेले पहिलवान कबड्डी खेळाडू पाटील यांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. हे लक्षात ही आले असावे.
पक्ष बांधणी करताना एकेक आपले सवंगडी बाजू देताना पाहून ते थोडेसे बिथरले. अहमदपूर चे चित्र पाहता मन हेलावून गेले. हजारो कार्यकर्त्यांचे संघटन केले असता तुम्ही चाकुर चे पहा अहमदपूर मद्ये काय आहे. देवानंद मुळे हे विधानसभेचे उमेदवार आहेत,असे काहींनी बोलले. वरिष्ठ नेते ही दखल घेईनात. मग हे संघटन मी कोणासाठी करु? मी सामाजिक क्षेत्रात काम करतो म्हणत. आमदार बाबासाहेब पाटील यांना राजकिय गुरू व आदर्श मानत मी त्यांच्याविरुद्ध का जाऊ म्हणून स्वगृही दि. ७ ऑगस्ट २०२३ सोमवारी सायंकाळी ८ च्या सुमारास बनसावरगाव तालुका चाकूर याठिकाणी राष्ट्रवादीत आ.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा प्रवेश केला.

मात्र जनतेत शिरूर च्या पहिलवानापुढे चाकुर च्या वाघाची डरकाळी नरमली अशीच चर्चा चर्चिली जात आहे