सेवापूर्तीनिमित्त सहकाऱ्याकडून सपत्नीक सत्कार , ऋणानुबंध वृंधीगत करणारा सोहळा
चाकूर : महावार्ता न्यूज/ सुशिल वाघमारे

सेवापूर्तीनिमित्त सहकाऱ्यकडून सपत्नीक सत्कार चाकूर: अहमदपूर येथील महात्मा फुले प्राथमिक विद्यालयातील लिपिक लक्ष्मण माधवराव गलाले हे ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नितीवयोमानाने सेवेतून निवृत्त झाले. महात्मा फुले प्राथमिक विद्यालयात त्यांनी ३६ वर्ष प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या सहकार्य वृत्तीने मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी हे आपलेसे होत. विद्यालयात त्यांचा संस्था व सहकारी यांच्या वतीने निरोप सामारंभ उत्सहात साजरा केला. मात्र सहकारी सहशिक्षक विश्वनाथ धोंडापुरे चापोलीकर यांनी मात्र आपल्या सहकारी कर्मचाऱ्याचा चापोली येथे विश्व निवासस्थानी दि.२ सप्टेंबर २०२३ शनिवारी लक्ष्मण गलाले व त्यांच्या पत्नी जयश्री गलाले यांच्या भरपेहराव सहकारी शिक्षक-शिक्षिका, मिञ परिवार नातेवाईक यांच्या उपस्थितीत सन्मान करून सत्कार केला.
यावेळी महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुसणे भागवत, चांदोरिककर अरविंद, अलट व्यंकटराव,सोमवंशी व्यंकटराव, उंदिरकल्ले सविता,पाटील मीरा , बिरादार स्नेहा, भगत अर्चना, स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर चापोली चे मुख्याध्यापक माधव होनराव,सुशिल वाघमारे, गोरख सावरगावे,
यांच्यासह पारिवारिक सदस्य वत्सला शंकर धोंडापुरे,माधव
गादगे, वैशाली धोंडापुरे, शोभा गादगे, संगीता सावरगावे, गोरगीले गणेश, पुंडलिक चाटे (माजी जि. प. सदस्य,) सरफराज देशमुख, वैजनाथ धोंडापुरे , धोंडापुरे विजया आदिजन उपस्थित होते.
महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मुसणे यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला.