लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने कायदे तज्ञ फली एस नरीमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

महावार्ता न्यूज : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने सभागृहात कायदे तज्ञ फली एस नरीमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
देशातील कायद्याच्या क्षेत्रात अधिकारी व्यक्ती मानली जाणारी जी मोजकी माणसे आहेत त्यात ज्येष्ठ कायदे तज्ञ फली एस नरिमन यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी
२२वर्ष मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली , सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत होते तर १९७२ ते ७५ या काळात भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे.१९९९ ला राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिले अशा या अभ्यासू व्यक्तीमत्वाचे वयाच्या ९५ व्यां वर्षी दुःखद निधन झाले आहे.
लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अँड महेश बामणकर, सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले आहे , यावेळी अँड अभय खानापुरे, अँड हंसराज साळुंके, अँड सुशिल उपासे, अँड गुरलिंग काळे, अँड दौलत दाताळ, अँड एम डी इंगळे, अँड सुर्जितसिंह ठाकुर, अँड भालचंद्र कवठेकर, अँड शिवाजी कराड, अँड लहू चामे, अँड लहू सुरवसे, अँड नामदेव काकडे, अँड शिरीष दहिवाल , अँड अनिल चूनगुणे, अँड धनराज औत्ताडे , अँड मिटकरी , अँड धनराज पाटील आदी उपस्थित होते.