मनोरंजन

सहलीला गेलेल्या २ शिक्षक व ९ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुन अंत.

एनडीआरएफ अग्निशमन दलाच्या मार्फत इतर विद्यार्थी व शिक्षकांचा शोध सुरू.

गुजरात महावार्ता न्यूज : तलावातील पाण्यात बुडून गुजरात राज्यातील 9 विद्यार्थी दोन शिक्षकांचा मृत्यू. सहलीसाठी आलेले 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक वडोदरा शहराच्या बाहेर असलेल्या हरणी तलावात ते नौका विहार करत होते. अचानकपणे नाव पलटली आणि अशी दुर्घटना घडली.

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानामार्फत बचाव कार्य सुरू आहे. सदरील घटना दिं १८ जानेवारी २०२४ रोजी गुरुवारी दुपारच्या सुमारास घडले असून बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सदरील घटनेचा आढावा घेऊन योग्य ती मदत सुरू असल्याची माहिती महावार्ता न्यूज बोलताना दिले.
सावधान आपण आपले पाल्य सहलीला पाठवत
असाल नौका विहार करत असाल तर आपण सुरक्षा जॅकेट परिधान केला आहे का? आपण सुरक्षितपणे बसलो आहोत का? सदरील नोकेची आसन क्षमता किती आहे? तलाव अथवा समुद्र सुरक्षित व सेफ आहे का याची माहिती घेऊनच मौज मस्ती आणि सफर करावी अन्यथा आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो. यासाठी नौका विहार करत असताना आपली काळजी आपणच घ्यावी अन्यथा जीवाला मुकण्याची वेळ आपल्यावरही येऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button