
चाकूर : (महावार्ता न्यूज नेटवर्क) येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थांनीनी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित नवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित गर्भा (दांडिया) नृत्य अविष्कार उस्फुर्तपणे सादर करून विद्यार्थ्या मध्ये चैतन्य व उत्सह निर्माण केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेश विभुते तर मंचावर प्रमुख उपस्थिती सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बबिता मानखेडकर, तसेच प्रा. डॉ. मगदुम बिदरे, प्रा. मंगल माळवदकर, प्रा. सुलभा गायकवाड, प्रा. स्वाती नागराळे, प्रा.रूपाली पवार (कदम ), सुनंदा पाटील , प्रा डॉ. सुमित देशमुख, प्रा. दिपक बुक्टे उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. विभुते म्हणाले विद्यार्थ्यांनी बंधुभाव व मैत्री भावना जपत सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले पाहिजे, भारत हा विविधतेने नटलेला देश असुन प्रत्येक प्रांताची आपली लोकसंस्कृती, लोककला, लोकगीत, लोकनृत्य असतात या कला मानवाला जगण्याची उर्मी देत असतात , विद्यार्थ्यांनी मूल्य जपत कला सादर केली पाहिजे व प्रेक्षकांनी मूल्यसंस्कार जपत कलेचा आस्वाद घेतला पाहिजे असे विचार व्यक्त करत विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .
प्रास्तविक प्रा. मंगल माळवदकर यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रा. बबिता मानखेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी बाळासाहेब जाधव, अश्फाक शेख, येमे सोपान यांनी परिश्रम घेतले.