विद्यार्थी कृती समिती च्या वतीने ठिय्या आंदोलन,विध्यार्थी आक्रमक..
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन,

छत्रपती संभाजीनगर (महावार्ता न्यूज) दि.16: येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मग्ल मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौका मध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थित खालील मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले .
1)TCS IBPS ऑनलाईन परिक्षा पध्दत बंद करा
2) सर्व परिक्षा Mpsc कडे द्याव्या
3) परिक्षा शुल्क कमी करा
4) पोलिस भरती जाहिरात लवकर काढा
5) पेपर फोडणाऱ्या दोषीवर अजीवन स्पर्धा परिक्षा बंद करा
6)2019 च्या परिक्षेचे काय?
7) तलाठी भरतीवर SIT चौकाशी बसवा
8) PSI STI च्या जागा वाढवण्यात याव्या
अशा मागण्या घेवून क्रांती चौक येथे प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना कृती समितीच्या वतीने वरिल मागण्यांचे निवेदनसादर करण्यात आले.
या आंदोलनासाठी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश उजगरे , महासचिव राहूल मकासरे , सचिव सिद्धार्थ पाणबूडे , सहसचिव अजय गायकवाड व विद्यार्थी कृती समितीच्या सर्व पदाधिकार्यांनी विशेष मेहनत घेतली.